प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी रशियन नागरिकत्व असलेल्या नागरिकांकडून पाच लाख रुपये किंमतीचा चरस हे अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी तेंबवाडा मोरजी येथे मार्क सिमस्ल या नागरिकाला रंगेहात पकडून त्यांच्याकडून 500 ग्राम चरस जप्प केला.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना खास सूञाकडून माहिती मिळाली कि एक रशियन नागरिक मार्क सिमस्ल हा मारुती कारमधून जीए.11- ए.2957 या क्रमांकाच्या भाडेपट्टीवर घेतलेल्या गाडीने आपल्या ग्राहकांकडे 4 जुलै रोजी तेंबवाडा मोरजी येथे देण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी आपल्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, हेडकान्स्टबल प्रवीण महाले, पोलीस कर्मचारी विनोद पेडणेकर , अर्जुन कळंगुटकर, संदेश वरक, आणि महेश नाईक यांची टिम तयार करुन सापळा रचून संशायीत मार्क याला रंगेहात चारससह पकडण्यात आले. संशयीत व त्यांनी वापरलेली अमली प्रदार्थ व्यवहारासाठी गाडीही पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत संशयीत मार्क सिमस्ल? यांच्यावर अमली प्रदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पेडणे निरीक्षक उत्तर गोवा अधिक्षक सोबित सक्सेना तसेच म्हापसा उपआधिक्षक गजानन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.