पेडणे तालुका पायलट असोसिएशन
प्रतिनिधी / पेडणे
कोरोनामुळे आणि लॉकडाऊन ने सर्वसामान्य व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातील सर्वसामान्य आणि प्रामाणिक विश्वासू असणारा रस्त्यावरील व्यवसाय म्हणजे मोटारसायकल पायलट व्यवसाय. हा व्यवसायही स्पर्धात्मक युगात धोक्मयात आला असून आता लॉक डाऊन काळामुळे आता पायलट व्यवसाय धोक्मयात आला आहे . सध्या आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने पायलट यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आम्हालाही सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पेडणे तालुका मोटारसायकल पायलट असोसिएशनने केली आहे .
राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे राज्याच्या हितासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत आहेत . लॉकडाऊन काळात पायलट व्यवसाय अडचणीत आला आहे , कुणीच बाहेर पडत नसल्याने पायलटाना भाडी मिळेनाशी झाली आहे . पायलटने बँक मधून कर्ज काडून काढून गाडय़ा घेतल्या व दिवसाला उन्हां पावसात पायलट स्टॕण्डवर उभे राहून एखाद भाडे मिळते का याकडे त्यांचा कटाक्ष असतो .त्याच्या व्यवसायावरच त्याचे कुटुंब चालते . भाडे नाहीतर घरात खायचे काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे .
पेडणे तालुका पायलट असोसियेशनचे एकूण दहा सदस्य पायलट आहेत . हे पायलट पेडणे जुन्या टॕक्शी स्टॕण्डकडे एका रस्त्याच्या बाजूला उन्हां पावसात थांबून भाडे मिळते कि काय अशी वाट बघत असतात , लॉकडाऊन काळात हा व्यवसाय धोक्मयात आला आहे . सरकारने आम्हालाही मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्यातील मजूर कामगारांना दरमहिना सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे .तशीच आर्थिक मदत सरकारने आम्हाला द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाबलो पालयेकर यांनी केली .
यावेळी असोसियेशनचे अध्यक्ष बाबलो पालयेकर , माजी अध्यक्ष शिवानंद शेटकर , आतामाराम सावळ देसाई , गोपाल कांबळी , सायर फर्नांडिस , रमेश पार्सेकर , हनुमंत नागवेकर , प्रभाकर गडेकर , मारुती नागवेकर ,गुरुनाथ नाईक आदी पायलटानी आपली कैफियत पत्रकारांकडे मांडली.
यावेळी गुरुनाथ नाईक यांनी बोलताना सांगितले आपण अनेक वर्षे पायलट म्हणून कार्यरत आहे , मागच्या एक महिन्यापासून आम्हाला भाडे मिळत नाही , त्यामुळे उपासमार करावा लागतो . घरातून पेट्रोलपंपकडे जाण्यासाठी गाडीत पेट्रोल घालायला पैसेही नसतात , याची गंभीर दखल मुख्यमत्री डॉक्टर सावंत यांनी घेवून आम्हाला न्याय द्यावा , आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे . भाडे नसल्याने आम्ही घरात मुला बाळासाठी काय नेणार असा सवाल करून सरकार सर्वाना कडधान्य , भाजी पुरवठा करतात आम्हाला अजूनपर्यंत कुणीही काहीही दिलेले नाही .
ड़ शिवानंद शेटकर यांनी बोलताना आम्ही महिनाभर घरात बसून होतो , सरकारच्या कायद्याचे आम्ही पालन केले . आमची कैफियत पत्रकारांकडे मांडावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आहोत , सरकारने आमची दखल घेवून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केले .
यावेळी उपस्थित पायललटानी आपापली कैफियत मांडली .