अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 17 जुलै 2021, सकाळी 9.30
● गेल्या 24 तासात 872 जण कोरोना बाधित ●11 हजार 761 जणांच्या तपासण्या ● कराड, सातारा, कोरेगावमधील कहर सुरूच ● पर्यटन क्षेत्र महाबळेश्वर कोरोनामुक्तीच्या वाटेवर ● दुष्काळी माण, खटावमध्ये प्रमाण आटोक्यात ● अन्य दुकाने मर्यादेत उघडण्या परवनगी द्या
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आहे. जिल्ह्यातील गेल्या 24 तासात 11,761 जणांच्या swab ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 872 जण बाधित आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 50 हजार 840 जणांचे swab घेतले गेले तर आतापर्यंत एकूण बाधित 2 लाख 7 हजार 764 एवढे आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.41वर असून, अद्याप जिल्हावासीयांना लॉकडाऊनमध्ये रहावे लागत असल्याने जिल्हा प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा अनलॉक होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. मात्र, लोक प्रतिनिधींचे काहीच अडत नसल्याने ते ठोस भूमिका प्रशासनाकडे जाहीर करत नाही. प्रशासनाला लोकप्रतिनिधी नेमकी नियमावली काय हे विचारणा करत आहेत. कालच्या बैठकीत नुसताच आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित मंडळींना पहिल्या लाटेत, दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची काय स्थिती दाखवून दिले. जिल्ह्यातील टेस्टिंग कमी झालेले नाही. काल रात्री 12 वाजता आलेल्या अहवालात गेल्या 24 तासात 11,761 तपासणी झालेल्या आहेत तर त्यात 872 जण पॉझिटिव्ह आले असून 7.41 एवढ्यावर आली आहे. असे असताना जिल्हा खुला करायला प्रशासनाने काल रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही. त्याबद्दल तीव्र नाराजी आहे.
लॉकडाऊनची वेळ तरी वाढवा, अन्य आस्थापनांना मर्यादित वेळ द्या
सध्या दुपारी 2 पर्यंत असलेली मर्यादा वाढवून ती 5 वाजेपर्यंत करावी आणि अन्य दुकाने मर्यादा घालून उघडण्यास परवानगी द्यावी ही न्याय आणि रास्त मागणी आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे अन्यथा त्यांना सोमवारपासून पुन्हा एकदा “सविनय कायदेभंग” डोळ्यादेखत पाहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
कराड, सातारामध्ये नको ती स्पर्धा
गेल्या आठवड्यापासून कराड तालुका पुढे आहे तर सातारा तालुका दोन नंबरवर त्या पाठोपाठ कोरेगाव तालुक्याचा नंबर लागतो. त्यानंतर फलटण व इतर तालुके आहेत. सगळ्यात शेवटी महाबळेश्वर तालुक्याचा नंबर लागतो. महाबळेश्वर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट स्थिर
गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट स्थिर राहिलेला आहे. तो पुढीलप्रमाणे दि.16 ला 7.41, दि.15 ला 7.16, दि 14 ला 6.71, दि.13 ला 6.43, दि.12 ला 6.97, दि.11 ला 5.84, दि.10 ला 6.65 असा पॉझिटिव्हीटी रेट असून, त्यामध्ये आज जरा वाढ झाल्याचे दिसत आहे.
शनिवारपर्यंत एकूण नमूने 13,50,840, एकूण बाधित 20,7764, घरी सोडलेले 19,4189, मृत्यू -5,003, उपचारार्थ रुग्ण 9,554