ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील कांग्रा शहरालगतच्या गग्गल पोलीस ठाण्यात कोब्रा सापाची तब्बल 21 पिल्ले आढळून आली आहेत. कपाटातील फाईल काढताना एका पोलीस कर्मचाऱ्याला ही पिल्ले बघून धक्काच बसला.
गग्गल पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी कपाटात एक फाईल शोधत होता. त्यावेळी त्याला एक सापाचे पिल्लू दिसले. त्यानंतर त्यांनी एका सर्पमित्राला बोलावून घेतले. त्यावेळी सर्पमित्राने एका कपाटातून तब्बल 21 पिल्ले काढली. कोब्रा सारख्या विषारी सापाची पिल्ले चक्क पोलीस स्टेशनमधील कपाटात पाहून सर्वांनाच धक्का बसला.
सर्पमित्राने कपाटातील सर्व सापांना पकडून एका डब्यात बंद केले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.