आरएल लॉ कॉलेजमध्ये जिमखाना विभागाचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्याची सवय विद्यार्थ्यांना विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करते, असे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाचे क्रीडा संचालक जगदीश गस्ती यांनी व्यक्त केले.
कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजमध्ये जिमखाना विभागाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, आजच्या तणावाच्या काळामध्ये प्रत्येकाला उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची गरज आहे. त्यासाठी खेळ उपयोगी ठरतात. तसेच आपली खिलाडुवृत्ती वाढीस लागते.
प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ण बदलले. परंतु हाती आलेल्या वेळेमध्ये आपलेच आत्मपरीक्षण करणे शक्मय झाले. तसेच विविध संकल्पना सुचू शकल्या, असे सांगून प्रत्येक वेळी यशाची खात्री नसल्याने अपयश खिलाडूवृत्तीने स्वीकारण्यासाठी खेळांचा कसून सराव करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
जिमखाना युनियनचे चेअरमन प्रा. पी. ए. यजुर्वेदी यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. अमित जाधव यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना एकनि÷तेची शपथ दिली. विद्यार्थी प्रतिनिधी पूजा बडकुंद्री यांनी आभार मानले.