बेळगाव :
महेश फौंडेशनमध्ये ‘प्रयत्न’तर्फे आयोजित हातमागावरील वस्त्रप्रावरणांचे व हस्तकलेचे प्रदर्शन व विक्रीचे शुक्रवारी उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन समारंभास रोटरी क्लब ऑफ दर्पणच्या अध्यक्षा शीतल प्रकाश चिलमी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रयत्न संस्थेच्या संस्थापिका मधू जाधव यांनी, सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काही उपक्रम सुरू केले आहेत, त्यापैकीच हा एक उपक्रम आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी ‘प्रयत्न’च्या आगामी उपक्रमाबद्दल थोडक्मयात माहिती दिली आणि जनतेने प्रयत्न संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
यावेळी शीतल चिलमी यांनी मेळाव्यास संबोधित केले आणि स्थानिक विणकरांना, विशेषत: महिलांना पाठिंबा देण्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ‘प्रयत्न’चे कौतुक केले. ‘प्रयत्न’ने स्त्रियांनी आपल्या चाकोरीबाहेर जाऊन स्वावलंबी बनविण्याचा उद्देश समोर ठेवून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘प्रयत्न’च्या प्रयत्नास नेहमी पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महेश फौंडेशनच्या मुलांच्या शिक्षणास मदत करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन आणि विक्री पुढील 5 दिवस 12 जानेवारीपर्यंत सुरू राहील. ‘प्रयत्न’ने बेळगाववासियांनी प्रदर्शनास भेट द्यावी आणि सुविधेपासून वंचित मुले आणि स्त्रियांचे समर्थन करून त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली.