न्यायालयीन अवमान प्रकरण
नवी दिल्ली :
वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे. 2009 च्या याप्रकरणी 17 ऑगस्ट रोजी सुनावणी केली जाणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रशांत भूषण यांनी 2009 मध्ये तहलका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत 16 माजी सरन्यायाधीशांपैकी निम्मे भ्रष्ट होते असे नमूद केले होते.
भूषण यांची टिप्पणी न्यायालयीन अवमानाच्या कक्षेत येते की नाही हे पाहिले जाणार असल्याचे न्यायाधीश अरुण मिश्रा, बी.आर. गवई आणि कृष्णमुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले आहे.