क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फीटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा आणि सेसा फुटबॉल अकादमी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपला.
काल हा सामना जीएफएच्या धुळेर फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आला. हा सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघाना गोल करण्याच्या संधी होत्या. मात्र उभय संघांच्या भक्कम बचावापुढे स्ट्रायकर्सना गोल करता आले नाहीत. या निकालाने एफसी गोवा व सेसा फुटबॉल अकादमीला प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. सेसा फुटबॉल अकादमीच्या डॉम्निक सुवारीसला सामनावीराचा पुरस्कार जीएफएचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांच्या हस्ते देण्यात आला.