वाळवंटातील एका गुहेतून सुमारे 2200 वर्षे जुन्या चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. आता या नाण्यांवरून पुरातत्वतज्ञांनी चकित करणारा खुलासा केला आहे. ही नाणी ज्यू बंडारांची कहाणी मांडण्यास पुरावे म्हणून अत्यंत उपयुक्त ठरू शकतात असे सांगण्यात आले.
चांदीची 15 नाणी ज्यूडियन वाळवंटात मुराबानजीक लाकडी बॉक्समध्ये आढळून आली आहेत. मृत समुद्रापासून अत्यंत नजीक असलेल्या एका गुहेत हा बॉक्स मिळाल्याचे इस्रयाल अँटिक्विटीज अथॉरिटीने म्हटले आहे. 167-160 ख्रिस्तपूर्व साली मॅकाबियन बंड झाले होते, त्याचकाळात ज्यू योद्धय़ांनी सेल्यूसिड साम्राज्याच्या विरोधात बंड केले होते. ही नाणी या बंडापेक्षा 10-15 वर्षे जुनी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एक व्यक्ती गुहेत स्वतःची वैयक्तिक संपत्री लपविण्यासाठी आल्याचा विचार करणे देखील अत्यंत रोमांचिकत करते. या गुहेत नाणी ठेवलेला व्यक्ती युद्धात मारला गेलेला असू शकतो. या नाण्यांना प्राप्त करण्यासाठी आम्हाला देखील 2200 वर्षांची प्रतीक्षा करावी लागल्याचे उद्गार या नाण्यांवरील अध्ययन करणाऱया पथकात सामील एटन क्लेन यांनी काढले आहेत.
क्लेन यांनी या शोधाला ‘एकदम अनोखे’ ठरविले आहे. बंडाच्या प्रारंभी किंवा त्यापूर्वी ज्यूडियन वाळवंटात असलेल्या गुहांनी स्वतःची अनोखी भूमिका पार पाडली असावी असे क्लेन यांचे म्हणणे आहे. परंतु इस्रायलच्या या दाव्यावर युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरामधील प्राचीन इतिहासाचे वरिष्ठ व्याख्याते बेनेडिक्ट एक्हार्डटं यांनी वेगळे मत मांडले आहे. एखादा शरणार्थी या नाण्यांना मॅकाबियन बंडावेळी घेऊन आला असेल, हा इस्रायलचा दावा म्हणजे केवळ एक शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी इस्रायल अँटीक्विटीज अथॉरिटीने चालू वर्षात 1500 वर्षे जुनी वायनरी शोधली होती. ही वायनरी एका वर्षात 25 लाख बाटल्या वाइन तयार करत असल्याचा दावा करण्यात आला होता.