तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे, कलादगी यांनी काढली समजूत
प्रतिनिधी / बेळगाव
उद्योग खात्री योजनेंतर्गत बेळगाव तालुक्मयातील काम देण्यात येत आहे. 40 ते 50 कामगारांमागे एक मुकादमांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी त्यांना यापूर्वी तीन रुपये फरक निधी देण्यात येत होता. आता त्या निधीमध्ये वाढ झाली असून ती पाच रुपये करण्यात आली आहे. मात्र ती रक्कम आपल्याला मिळत नाही, असे म्हणत संबंधित मुकादमांनी तालुका पंचायतसमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी तालुका पंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन छेडून सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी त्यांची समजूत काढली. मात्र त्यांनी दिवसभर आपले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.
रोहयेंतर्गत काम करणाऱया कामगारांना तीन रुपये फरक रक्कम देण्यात आली. मात्र काही वर्षांपासून त्यात बदल करून ती पाच रुपये केली. आता वर्षे उलटली तरी ती रक्कम देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. जोपर्यंत आपल्याला ती रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
तालुक्मयातील विविध ठिकाणांहून मुकादमांनी ता. पं.समोर आंदोलन छेडले होते. यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी त्यांची समजूत काढुन सरकारला याबाबत आपण पत्राद्वारे माहिती देऊ, असे आश्वासन दिले. मात्र मुकादमांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. केंद आणि राज्य सरकार रोजगार हमी योजनेंतर्गत कामगारांना काम देते. याचबरोबर या कर्मचाऱयांवर नजर ठेवण्यासाठी मुकादमांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र फरक निधी देण्यात येत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तालुक्मयातील अनेक महिला मुकादम उपस्थित होत्या.