नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना लसीकरणाचा तिसऱया टप्प्याला भारतात सुरुवात झाल्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यावर आता उपाय म्हणून सरकारच्या वतीने लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने ‘फायझर’ची लस मिळविण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. भारत सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी फायझर यांच्या दरम्यान एक उच्चस्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भारताला लवकरच पाच कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्मयता आहे.
सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीची आयात करण्यात आली आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी त्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी, अशी विनंती भारत सरकारकडे केली होती. त्यानुसार आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्मयता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.