योग अभ्यासातील पश्चिमोत्तानासन अनेक प्रकारचे शारिरीक, मानसिक आणि भावनात्मक समस्यांवरील प्रभावी आसन आहे.
- मेंदू शांत ठेवण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते कारण या आसनामुळे तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.
- त्याचबरोबर डोकेदुखी, चिंता आणि थकवा दूर करण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.
- या आसनामुळे मणका, खांदे हे ताणले जातात. हृदय, मूत्रपिंड, अंडाशय आणि गर्भाशय यांची क्रिया सामान्य करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे.
- रजोनिवृत्ती आणि मासिक पाळी याचे त्रास कमी करण्यासही मदत होते.
- पश्चिमोत्तानासन करताना पाठ सरळ करून बसावे, पाय समोर पसरावेत. श्वास घेत दोन्ही हात वर उचलून मागे न्यावेत. श्वास सोडत दोन्ही हात समोरच्या बाजूला आणत खाली झुकत पायाचे अंगठे पकडावेत.
- हात कोपरातून वाकवावे. डोके गुडघ्याला टेकले पाहिजे.
- हे आसन केल्यानंतर पूर्वोत्तान आसन जरूर केले पाहिजे.