प्रतिनिधी / बेळगाव
अळवण गल्ली, शहापूर येथील दि असोसिएशन ऑफ फिजीकली हॅन्डीकॅप्ड असोसिएशनतर्फे फुलबाग गल्ली येथील घर जळालेल्या पाटील कुटुंबीयांना गॅस शेगडी व सिलिंडर देण्यात आले. मागील आठवडय़ात घराला आग लागल्याने किरण पाटील यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
घरासोबत घरातील गॅस शेगडी व सिलिंडरही जळून नुकसान झाले होते. त्यांना असोसिएशनने सिलिंडर व शेगडी देण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष वामन कट्टी, सेपेटरी गिरीष सव्वाशेरी, सचिन गवळी, अमीन शहापुरी उपस्थित होते.