प्रतिनिधी / सातारा
येथील सोमवार पेठेतल्या फुटक्या तळय़ाजवळील डिपीला सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली होती. डिपीला लागलेल्या आगीमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांना माहिती दिल्यानंतर ती आग आटोक्यात आणली गेली. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर या परिसरातील गेलेली लाईट परत आल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाठीमागे याच डिपीजवळ एक बॅनर लावला होता. त्यात विद्युत पुरवठा उतरला होत. त्यामुळे एका युवकास विजेचा धक्का बसला होता. दोन तासाच्या प्रयत्नानंतर डिपीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.