प्रतिनिधी / सातारा
शहरातील जुना मोटर स्टँड ते महात्मा फुले भाजी मंडई पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे.हे काम अतिक्रमण न काढता केले जात असून त्या बाबत सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सातारा शहरात सध्या अनेक रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत.त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जुना मोटर स्टँड परिसरातल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मोठय़ा उत्साहाने नेत्याच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आले होते.हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून महात्मा फुले भाजी मंडई ते जुना मोटर स्टँड पर्यंत खडीकरण अगोदर करून नंतर आता डांबर टाकण्याचे काम सुरू आहे.हे काम करत असताना या परिसरात झालेल्या अतिक्रमणे न काढता त्या टप्रयाच्या बाजूने काम केले जात आहे.ही नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक असून योग्य ती कार्यवाही करून अगोदर अतिक्रमण काढा अन नंतर रस्ता करा, अशी मागणी अमित शिंदे यांनी केली आहे.