पेडणेतील ट्रक ओनर असोसिएशनचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर असलेल्या ट्रक ट्रान्सपोर्टला देण्यात येणारा मोबदला खूपच कमी प्रमाणात असून तो परवडत नसल्याने तो वाढून द्यावा, अशा प्रकारचे निवेदन ट्रान्सपोर्ट कंत्राटदार यांना पेडणेतील ट्रक ओनर असोसिएशन तर्फे देण्यात आले आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरात चालू आहे. पेडणेतील ट्रक मालकांना काम मिळावं म्हणून येथील व्यावसायिकांनी सहा चाकी ट्रक विकत घेतले. मात्र मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळचे कंत्राटदारानी दहा चाकी ट्रक बाहेरून आणून स्थानिक ट्रक मालकांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले. ट्रक मालक संघटना पेडणे व ट्रक मालक संघटना इन्सुली यांच्या मालकीचे ट्रक घेऊन स्थानिक लोकांना व्यवसाय द्यावा अशी मागणी केली आहे.
स्थानिक लोकांना रोजगार द्यावा, ट्रक संबंधात जो दर दिला जातो तो खूपच कमी असून तो योग्य प्रमाणात द्यावा, किलो मीटर योग्य दर द्यावा, अंडरलोड माल घ्यावा आणि ट्रक मालकांना ठरल्या प्रमाणे दर महिना पगार घालावा अशा अटी घालून निवेदन ट्रान्सपोर्ट कंत्राटदारला दिले. त्याची प्रत उद्या दि 5 एप्रिल रोजी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळचे प्रमुख ठेकेदार सहसरा कंपनी यांना सादर करणार असल्याची माहिती ट्रक मालक संघटना पेडणे यांनी दिली आहे.
ट्रक मालक संघटना पेडणे व ट्रक मालक संघटना इन्स?ली यांच्या मागण्या कंत्राटदारांनी मान्य केल्या नाहीत तर कायदा हाती घेऊन रस्त्यावर उतरले जाईल असा इशारा ट्रक मालक संघटना पेडणे व ट्रक मालक संघटना इन्स?ली यांनी दिला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल असं वाटलं होतं मात्र सध्या तसे होत नाही. उलट स्थानिकानाच त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी यावर उपाय योजना काढावी आशी मागणी ट्रक मालक संघटना पेडणे व ट्रक मालक संघटना इन्सुली यांनी केली आहे.