वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिसेस्टर सिटी फुटबॉल क्लबने 21 वर्षीय वेस्ले फोफानाशी अलीकडेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवा करार केला. या करारानुसार, आता फोफाना लिसेस्टर सिटी क्लबमध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी म्हणजे 2020 ऑक्टोबरमध्ये फोफाना सेंट इटेनी क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता. फ्रान्सच्या फोफानाने 21 वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉल विविध स्पर्धांमध्ये 22 सामन्यांत फ्रान्सचे प्रतिनिधीत्व केले आहे.