ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्स आणि कोलंबियात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत फ्रान्सचा जगात सातवा तर कोलंबियाचा आठवा क्रमांक लागतो.
फ्रान्समध्ये आतापर्यंत 9 लाख 99 हजार 043 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 1 लाख 8 हजार 599 या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 लाख 56 हजार 234 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2319 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 34 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 1 कोटी 41 लाख 82 हजार 285 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कोलंबियात 9 लाख 90 हजार 270 कोरोना रुग्ण आढळले असून, त्यामधील 8 लाख 93 हजार 712 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 66 हजार 922 रुग्ण उपचार घेत असून, 2115 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 29 हजार 636 रुग्ण दगावले आहेत. कोलंबियात 46 लाख 15 हजार 614 चाचण्या करण्यात आल्या आहेत.