नवी दिल्ली
सौंदर्य प्रसाधन उत्पादने विक्री करणाऱया बजाज कन्झुमर केअरचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2021 मध्ये चौथ्या तिमाहीत 134 टक्क्यांनी वाढून 54.68 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीच्या महसुलात 42 टक्के वाढ झाली असून 244 कोटी रुपयांचा महसूल सदरच्या कालावधीत कंपनीने प्राप्त केला आहे. बजाज ग्रुपची ही कंपनी सौंदर्य प्रसाधन उत्पादनांची विक्री करते. बजाज अलमंड ड्रॉप हेअर ऑइल हे तेल कंपनीचे लोकप्रिय आहे. नोमार्कस् ब्रँडही भारतात कंपनीने आपल्या ताब्यात ठेवला आहे.