साहित्य : 200 ग्रॅम मैदा, 180 ग्रॅम अनसॉल्टेड बटर, 60 ग्रॅम आयसिंग शुगर, चिमुटभर मीठ, पाव चमचा व्हॅनिला एक्स्ट्रक्ट
कृती : ओव्हन 180 डीग्रीवर 8 ते 10 मिनिटे प्रिहीट करावे. मैदा चाळून घ्यावा. बाऊलमध्ये बटर, साखर आणि व्हॅनिला एक्स्ट्रक्ट चार ते पाच मिनिटे फेटावे. नंतर त्यात मैदा थोडा थोडा मिक्स करीत मिश्रण मऊसर बनवावे. एक प्लास्टिक बॅग घेऊन त्याचा कोन बनवावा. त्यात कुकीजचे मिश्रण भरून त्याला एक मोठे छिद्र पाडावे. बेकिंग ट्रेला तुपाचा हात लावावा. आता बेकिंग ट्रेवर कुकीजचे मिश्रण भरलेला कोन धरून गोलाकार कुकीज घालाव्यात. ट्रे ओव्हनमध्ये ठेऊन हलक्या सोनेरी रंगावर कुकीज बेक करावेत. तयार कुकीज गार झाल्या की चहा अथवा कॉफीसोबत खाण्यास द्या.
टीप : साखर, बटर आणि व्हॅनिला एक्स्ट्रक्टचे मिश्रण जास्त फेटू नये. जास्त फेटल्यास कुकीजला आकार येत नाही. कुकीज कुकरमध्येही बनवू शकता.