प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेली महिनाभर बांधकाम व्यवसाय बंद पडलाय आहे. बांधकाम मजूरची कमवावे तेव्हाच खावे अशी परिस्थिती असते. यामुळे या कामगारांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कल्याणकारी मंडळाने मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र बांधकाम सल्लागार समितीचे सदस्य बी जी मांगले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे बंद असल्याने जगावे कसे अशा प्रश्न बांधकाम कामगारांपुढे उभा राहिला आहे. अशावेळी त्यांच्या हक्काच्या निधीतून म्हणजेच इमारत बांधकाम कल्याणकर मंडळाच्या निधीतून रोख मदत कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी मांगले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री बच्चू कडू, आमदार चंद्रकांत जाधव याच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बांधकाम
कामगारांच्या कल्याणकारी
मंडळाने मदत करावी
कोल्हापूर
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे
गेली महिनाभर बांधकाम व्यवसाय
बंद पडलाय आहे .बांधकाम
मजूरची कमवावे तेव्हाच खावे
अशी परिस्थिती आसते.कोरोना
च्या पार्श्वभूमीवर कामे बंद
असल्याने जगावे कसे अशा प्रश्न
त्यांच्या पुढे उभा राहिला
आहे अशावेळी त्यांच्या
हक्काच्या निधीतून म्हणजेच
इमारत बांधकाम कल्याणकर
मंडळाच्या निधीतून रोख मदत
कामगारांच्या बँक खात्यावर
जमा करावी .अशी मागणी
मांगले यांनी राज्याचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
,उपमुख्यमंत्री
अजित पवार, कामगार
मंत्रीदिलीप वळसे पाटील
,ग्रामविकास मंत्री
हसन मुश्रीफ,मंत्री
बच्चू कडू , आमदार
चंद्रकांत जाधव याच्या.
कडे पत्राद्वारे केली
आहे.