वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रविवार दि. 26 रोजी 41 जणांना बाधा झाल्याचे आढळून आले असून तर 44 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. एकूण बाधित संख्या 1266 झाली असून संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 724 वर पोचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. त्याचप्रमाणे जिल्हय़ात रविवारी कोरोनाचे दोन बळी गेले.
बागलकोट 15, जमखंडी 3, बनहट्टी 6, मुधोळ 3, बिळगी 2, बदामी 2, तेरदाळ 1 व अन्य जिल्हय़ातील 6 अशा एकूण 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
अद्याप 686 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून आतापर्यंत 23,102 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असता त्यापैकी 20,910 निगेटिव्ह, 1266 पॉझिटिव्ह, 39 बळी, 724 कोरोनामुक्त, 506 रुग्णावर उपचार सुरू आहेत. कंटेन्मेंट झोन 118 असून 6296 जणांची क्वारंटाईनमधून सुटका झाली आहे.
बागलकोट जिल्हय़ातील गुळेदगुड्ड येथील 55 वर्षांचा पुरुष जुलै 21 रोजी दवाखान्यात दाखल झाला होता. त्याचा दि. 26 रोजी मृत्यू झाला तर बदामी तालुक्यातील केरुर येथील 45 वर्षांची व्यक्ती दि. 21 ला दवाखान्यात दाखल झाली. त्याचा दि. 25 जुलै रोजी रात्री मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱयांनी दिली.