ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘बाटा’ या प्रसिद्ध चप्पल कंपनीच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी प्रथमच भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. संदीप कटारिया असे या व्यक्तीचे नाव असून, ते यापूर्वी बाटा इंडियाचे CEO होते.
बाटाचे स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. एलेक्सिस नसार्ड हे यापूर्वीचे बाटाचे CEO होते. त्यांच्या जागी कटारिया यांना संधी देण्यात आली आहे. 2017 साली कटारिया हे बाटा इंडियाचे CEO म्हणून रुजू झाले. कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाने भारतात दुप्पट नफा कमावला. मागील आर्थिक वर्षात भारतात बाटाने निव्वळ 327 कोटी नफा कमावला होता.
कटारिया यांच्या कामाचा वाढता आलेख पाहून बाटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली.