पेडणे ( प्रतिनिधी )
कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही .
मात्र तुये येथील हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वितरित करण्यात आली .
कोरोना संसर्ग वाढत असल्याने पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला . कोरोना महामारीच्या ला?कडाऊन काळात किमान 9950 नागरिकांना कडधान्य ,भाजीपाला ,रेशनिंग धान्य मोफत वितरित करण्यात आले .
शुक्रवारी 6 रोजी उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचा जन्मदिवस त्या दिवशी त्यांनी तुये इस्पितळातील रुग्णांना फळे वितरित करण्याचा उपक्रम राबविला . यावेळी तुये आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डा?.विद्या परब, माजी नगराध्यक्ष आणि पेडणे भाजप मंडळ सरचिटणीस उषा नागवेकर , चांदेल – हसापूर सरपंच संतोष मळीक ,ज्ञानेश्वर परब , उद्योजक रुदेश नागवेकर मायकल फर्ना?डिस आदी उपस्थित होते.
ड़ यावेळी माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना कोरोनाच्या महामारी मुळे उपमूख्यमंञी बाबू आजगावकर यांचा वाढदिवस जाहीरपणे मतदार हितचिंतक समर्थकांच्या उपस्थितीत साजरा करता आला नाही . मात्र मंत्री आजगावकर यांनी आपल्या वाढदिनी रुग्णांना फळे वितरित करण्याचा कार्यक्रम करून रुग्णा प्रति असलेल्या भावना दाखवून दिल्या. .
ड़ संतोष मळीक यांनी बोलताना सर्वसामान्य जनतेचा नेता जर उंच शिखरावर पोचला तरीही सर्वसामान्य जनातेच्या हृदयात त्यांनी कायम घर केले आहे . मतदार संघतील समस्या कशा सुटाव्या होतील यावरच त्यांचे नेहमीच प्रयत्न असतात. अअसा नेता पुन्हा पुन्हा पुन्हा या मतदार संघातून विजयी होईल असा विश्वास संतोष मळीक यांनी व्यक्त करून ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे लोकनेते असल्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे म्हणाले.