अमेरिकेत लवकरात लवकर अधिक लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी नवी योजना तयार केली आहे. त्यांनी स्टॉकमध्ये ठेवण्यात आलेल्या लसीचे सर्व डोस एकाचवेळी उपलब्ध करण्याचा आदेश दिला आहे. लसीची साठवणूक केली जाणार नाही. डोस तत्काळ गरजू लोकांना देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.
तर ट्रम्प प्रशासनाने लसीचे अनेक डोस राखून ठेवण्याचा आदेश दिला होता. पहिला डोस दिला जात असलेल्यांना वेळेत दुसरा डोसही मिळावा असा यामागे उद्देश होता. अमेरिकेच्या प्रशासनाकडे सध्या 2 कोटी 14 लाखांहून अधिक डोस उपलब्ध आहेत. यातील 59 लाख 19 हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागणार आहे.