बेंगळूर/प्रतिनिधी
बीबीएमपी शहरातील कोविड केअर सेंटर (सीसीसी) तात्पुरते बंद करण्याचा विचार करीत आहे. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही कमी झालेली रुग्णांचीसंख्या लक्षात घेऊन सीसीसी तात्पुरते बंद करण्याचा विचार करीत आहोत.” दरम्यान गरज वाटल्यास बीबीएमपी पुन्हा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल, असे म्हंटले आहे.
कोरमंगला इनडोअर स्टेडियममध्ये २०० खाटांचे कोविड केअर सेंटर आहे. ते बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी क्वचितच रुग्णांनी भेट दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. गांधीनगरमधील शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातील सीसीसी बंद आहे, कारण याठिकाणी ऑक्सिजन कमतरता आहे. तर काही कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्याने बंद करण्यात येत आहेत.
“आम्ही कमी रूग्ण असलेल्या सीसीसीची माहिती घेत आहोत. दरम्यान, त्यांना तात्पुरते बंद केले जय. नंतर रुग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा कोविड महामारीत अधिक चांगला उपयोग आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत होईल, असे सहआयुक्त (एसडब्ल्यूएम) सरफराज खान म्हणाले. दरम्यान कोरोना प्रकरणांची संख्या कमी होत असल्याने सीसीसीमधील व्याप कमी झाले आहे, असेही खान म्हणाले.