सांगली प्रतिनिधी
बुधगाव ता. मिरज येथील नळपाणी योजना सौरऊर्जा वर चालवण्यासाठी 44 लाख 98 हजार 721 रु मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य अनिल डबल यांनी दिली.
नियोजन समितीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये गावची पाणीपुरवठा योजना सोलर पॉवरवर चालवण्यासाठी निधी मागणी केली होती. पालकमंत्री जयंतराव पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रतिसाद देत मागणी मान्य केली. आमदार अनिल बाबर यांनीही याबाबत मते मांडली.
बुधगाव चा पाणी पुरवठा सौरऊर्जा वर चालवण्यासाठी पाणी योजनेचे सर्व्हेक्षण , तांत्रिक मान्यता होऊन सर्व कार्यवाही पूर्ण होऊन आज च जिल्हाधिकारी यांनी सोलर योजनेसाठी 44, लाख 98, हजार 721 इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता देऊन निधी वर्ग केला 31 मार्च च्या आत हे काम झाल्यामुळे 2021 , 22 च्या निधीतून हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.