प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी जिल्हय़ातील 52 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे. तर 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिकोडी, गोकाक, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळला नाही.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अथणी तालुक्मयात 2, बेळगाव तालुक्मयात 3, बैलहोंगल तालुक्मयात 1, हुक्केरी तालुक्मयात 2, रायबाग तालुक्मयात 2 रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 4 हजार 279 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
जिल्हय़ातील कोरोना बळींचा सरकारी आकडा 900 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 13 लाख 6 हजार 852 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 12 लाख 18 हजार 279 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 542 इतकी आहे. त्यापैकी 78 हजार 366 जणांनी कोरोनावर मात केली आहे.