तालुक्यातील 473 जणांचा समावेश, पुन्हा भीतीचे वातावरण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दोन दिवस कमी रुग्ण आढळल्यानंतर जिल्हय़ात पुन्हा बुधवारी 1425 रुग्ण आढळले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव तालुक्मयामध्ये 473 रुग्ण आढळले असून तालुक्मयामध्येही धोक्मयाची घंटा निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने क्लोजडाऊनचे आदेश दिले होते. मात्र जनतेने कोणतेच सहकार्य केले नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र लॉकडाऊननंतरही मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार असून जनतेने काळजी घेणे, ही काळाची गरज बनली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आकडा दररोज हजारपेक्षाही पुढे जात आहे. त्यामुळे सर्वच दवाखाने फुल्ल झाले आहेत. ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनसाठी साऱयांची धडपड सुरू आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानादेखील जनता अजूनही सावध होत नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार दक्षता घेण्याचे आवाहन करून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते थकले आहे. प्रत्येकानेच स्वतःची स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र अद्याप तरी याबाबत जिल्हय़ामध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी नानावाडी, नाझर कॅम्प-वडगाव, नेहरुनगर, न्यू गुड्सशेड रोड, पाटील गल्ली-बेळगाव, पाटील गल्ली-वडगाव, पोलीस क्वॉर्टर्स, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, समादेवी गल्ली-बेळगाव, संभाजीनगर-वडगाव, शहापूर, शास्त्राrनगर, शाहूनगर, टिळकवाडी, टी. व्ही. सेंटर, विश्वेश्वरय्यानगर, वैभवनगर, वंटमुरी, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, शेरी गल्ली-बेळगाव, एसपीएम रोड, सोनार गल्ली-वडगाव, सुभाषनगर, विद्यानगर, विनायकनगर, विवेकानंदनगर, यमनापूर, यरमाळ रोड-वडगाव, भाग्यनगर, भांदूर गल्ली-बेळगाव, भारतनगर-शहापूर, कॅम्प, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर, कॉलेज रोड, फोर्ट रोड, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, जाधवनगर, हिंदवाडी, आदर्शनगर,अनंतशयन गल्ली, अंजनेयनगर, अशोकनगर, आझादनगर, अयोध्यानगर, ऑटोनगर, महांतेशनगर, माळमारुती, मंडोळी रोड परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील पिरनवाडी, मुतगा, येळ्ळूर, सांबरा, गणेशपूर, हिंडलगा-सुळगा, शिंदोळी, सुळेभावी, तारिहाळ, उचगाव, विजयनगर-हिंडलगा, काकती, होन्नियाळ, होनगा, हलगीमर्डी, के. के. कोप्प, कंग्राळी बी. के., संतिबस्तवाड, मच्छे, मोदगा, हिरेबागेवाडी, मुचंडी, एटीएस-सांबरा, धामणे, गणेशपूर परिसरात रुग्ण आढळले आहेत.