बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगर जिल्ह्यातील मुख्यालयात शुक्रवारी मॅनहोलची साफसफाई करीत असताना तीन स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दम लागल्याने मृत्यू झाला.
रामनगरचे पोलिस अधीक्षक एस.गिरीश यांनी पीटीआयला सांगितले की, “बेंगळूर येथील तीन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी मॅनहोलमध्ये प्रवेश केला होता. स्वछता करत असताना दम लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरातील कमला नगरातून ठेकेदाराने सहा जणांना जाम झालेले गटार साफ करण्यासाठी आणले होते. त्यातील एकाने प्रवेश केल्यावर, तो गुदमरल्याने मरण पावला. दुसर्यानेही आपल्या सहकार्याला वाचविण्याच्या प्रयत्न केला असता त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान बेंगळूरहून आणलेल्या ठेकेदाराच्या शोधात पोलिस होते.