मुंबई/प्रतिनिधी
१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख (anil deshmukh) यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावलं होतं. वारंवार समन्स बजावूनही ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नव्हते. २ महिन्यापासून बेपत्ता असणारे अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले. उच्च न्यायालयाने (high court) कोणताही दिलासा देणार नसल्याचे स्पष्ट झाल्यांनतर ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान, अनिल देशमुखनवर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. याआधी देशमुखांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे, असा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले होते. पण देशमुख २ महिन्यांपासून बेपत्ता होते.