बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. जी. बोम्मनहळ्ळी हे मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नूतन जिल्हाधिकारी म्हणून एम. जी. हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मूळचे के. के. कोप्पचे असून ते आता बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नूतन जिल्हाधिकाऱयांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. एम. जी. हिरेमठ हे एक अनुभवी आयएएस अधिकारी आहेत.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने सोमवारी 15 आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार धारवाड जिल्हधिकारी पदावर नितेश पाटील, बागलकोट जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहकपदी भूबालन टी. तसेच गदग जिल्हाधिकारीपदी सुंदरेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झियाउल्ला यांना सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारपदी नेमण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले होते.
वाणिज्य कर खात्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी पवनकुमार मलपटी, कोप्पळ जिल्हाधिकारी पदावर सरळकर विकास किशोर, सर्व शिक्षण अभियानच्या राज्य योजना संचालकपदी दीपा एम. बेंगळूर महानगरपालिकेच्या विशेष आयुक्तपदी पोमला सुनिलकुमार, अर्थखात्याच्या उपसचिवपदी चंद्रशेखर नायक, अटल जनस्नेही केंद्राच्या संचालकपदावर गंगूबाई मानकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.