क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महारोगामुळे देशातील अनेक कुस्ती मैदाने रद्द करण्यात आली आहेत. अखिल भारतीय कुस्ती महासंघाने कुस्ती पटूंच्या प्रोत्साहनासाठी ऑनलाईन कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यामुळे सरावापासून दूर असलेल्या मल्लांना फेडरेशनने दिलासा दिला होता.
मल्लांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि कुस्तीपासून दूर न होण्यासाठी कुस्ती सरावाच्या व्हिडीओ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला संपूर्ण देशातून मोठय़ा संख्येने पाठिंबा मिळाला होता. बेळगावच्या उदयोन्मुख मल्लांनी सुध्दा याचा लाभ घेतला. यावेळी बेळगावच्या मल्लांनी अस्मरणीय कामगिरी करताना सुवर्णपदकांना गवसणी घातली.
या स्पर्धेसाठी बेळगाव जिह्यातून 36 कुस्तीपटूंनी मोठय़ा उत्साहाने भाग घेतला होता. यावेळी रोहन बाळेकुंद्री (कडोली, तालीम), रोहीत कोलीक (मठपती आखाडा), शंकर जक्कोळी (तीर्थकुंडये), शिवम पाटील (मुतगे), संकल्प (कंग्राळी), महादेव इटगी, रोहीत पाटील, प्रज्वल (मच्छे), रोहीत (माचिगड), रुपेश कुगजी, ऋषिकेश (नंदगड), वैभव मुरकुटे, ओंकार (सावगाव), सुशांत, समर्थ (बेळगुंदी), ऋतुजा गुरव (गणेबैल), राधिका (संतीबस्तवाड), स्वाती पाटील यांनी उत्तेजनार्थ बक्षीसे पटकाविली.
कुस्ती जीवंत ठेवण्यासाठी उद्योजग पप्पु होनगेकर आणि अखिल भारतीय कुस्तीमहासंघाचे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष हणमंत गुरव यांच्या प्रोत्साहनामुळे या मल्लांना यश मिळविता आले. यांचा लवकरच दिल्ली येथे होणाऱया समारंभात सत्कार केला जाणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र कालीरामन, चेअरमन प्रशांत रोहतगी, जाईंट सेपेटरी संजीव जून तरुण चौधरी, अजय भारद्वाज यांनी विशेष परिश्रम घेवून स्पर्धा यशस्वी केली.