वृत्तसंस्था/ पुणे
टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड सेव्हेली आणि जॉन स्मिथ यांचा पराभव केला.
एटीपी विश्व टूर स्पर्धेतील बोपण्णा आणि रामकुमार यांचे दुहेरीतील हे दुसरे विजेतेपद आहे. रविवारी येथे झालेल्या पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड सेव्हेली आणि जॉन पॅट्रीक स्मिथ यांचा 6-7 (10-8), 6-3, 10-6 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना 100 मिनिटे चालला होता. गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत बोपण्णा आणि रामकुमार यांनी दुहेरीत उपविजेतेपद मिळविले होते. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात ऍडलेड येथे झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेत या जोडीने दुहेरीत पहिल्यांदा विजेतेपद पटकाविले होते.