19 वर्षीय युवतीचा सापडला मृतदेह : टय़ुनीशियन प्रियकर अटकेत
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश युवतीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी टय़ुनीशियाच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सबिता थानवानीचा (19 वर्षे) मृतदेह शनिवारी लंडनच्या क्लर्केंवेल भागात विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये सापडला, तिच्या मानेवर गंभीर जखमांच्या खुणा होत्या असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सबिता ही 22 वर्षीय महीर मारुफसोबत रिलेशनशिपमध्ये होती असे चौकशीत आढळून आल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम उघडली होती. पोलिसांनी संशयाच्या आधारावर मारुफला रविवारी अटक केली आहे. अटकेदरम्यान त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
सबात लंडन विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी तिला मारुफसोबत पाहिले गेले हेते. तिच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सबिताच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मारुफ हा टय़ुनीशियन नागरिक असल्याने त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही, याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे स्पेशल क्राइम युनिटच्या डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर लिंडा ब्रॅडली यांनी सांगितले आहे.