प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्र. 39 मधील मराठी भाषिक अपक्ष उमेदवार नेताजी (बाळू) मनगुतकर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रभागातील भारतनगर क्रॉस नं. 5 व 6 येथील नागरिकांनी मनगुतकर यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
येथील पंच मंडळी आणि कार्यकर्त्यांनी तिरंगा सेवा संघटनेच्या फलकाद्वारे नेताजी मनगुतकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. फलकाच्या ठिकाणी पंच मंडळींनी मनगुतकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच त्यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी पंच मंडळींसह गल्लीतील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गणेशपेठ गल्ली व शिवाजी गल्ली, कोरवी गल्ली जुनेबेळगाव, भारत नगर 4 क्रॉस व गंथडे चाळ मधील नागरिक, लक्ष्मी नगर, मलप्रभा नगर वडगाव नागरिक, धामणे रोड खासबाग येथील नागरीक, ढोरवाडा वडगाव परिसरातील नागरिकांनी आपला पाठींब्याचे पत्रक दिले आहे. तसेच मराठी भाषिकांनी नेताजी मनगुतकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.