वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील युवा फुटबॉलपटूमध्ये चांगली क्षमता आणि दर्जा पाहावयास मिळतो. दरम्यान या युवा फुटबॉलपटूंना उच्च स्तरावर विदेशातील फुटबॉल स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे जरूरीचे आहे, असे वैयक्तिक मत ऑस्ट्रेलियाचा माजी फुटबॉलपटू तसेच इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया जमशेदपूर एफसी संघातील प्रमुख हुकमी स्ट्रायकर टीम काहीलने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या काहीलने 2018-19 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात जमशेदपूर एफसी संघातून निवृत्त होत आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीला निरोप दिला. भारतातील युवा फुटबॉलपटूमध्ये चांगली क्षमता आणि दर्जा दिसून येतो. त्यांच्या टॅलेन्टला वाव देण्यासाठी अधिक सामन्यांची संधी उपलब्ध करून देणे जरूरीचे आहे, असे प्रतिपादन काहीलने स्टार स्पोर्टस् फुटबॉल युनायटेड या कार्यक्रमात बोलताना केले.