प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गौतम बुद्ध जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली.
प्रारंभी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके व किरण जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच यानिमित्त लॉकडाऊन काळात स्वच्छता राखण्याचे कार्य करणाऱया महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सम्राट परिवाराच्यावतीने उपस्थितांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी, मल्लेश चौगुले, दीपक मेत्री, शेखर शिंगे, रमेश कांबळे, यशवंत सम्राट, राजेंद्र सम्राट, प्रकाश सम्राट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते..