वृत्तसंस्था/ जमशेदपूर
संयुक्त अरब अमिरातमध्ये पुढील आठवडय़ात होणाऱया आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यांसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाचा विदेशी दौरा आयोजित केला आहे. 2022 साली मायदेशात होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून या दौऱयाचे आयोजन केले आहे.
सध्या भारतीय फुटबॉल संघाचा सराव जमशेदपूरमध्ये सुमारे एक महिना चालू होता. भारतीय फुटबॉल संघ संयुक्त अरब अमिरात आणि टय़ुनिशियाबरोबर दोन मित्रत्वाचे सामने खेळणार असून हा संघ 30 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातला प्रयाण करणार आहे. या दौऱयात भारतीय संघ बहरीनमध्ये दोन मित्रत्वाचे सामने बहरीन आणि चिनी तैपेई यांच्याबरोबर खेळणार आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय महिला संघासाठी चार सामने आयोजित केले आहेत. हे सामने संयुक्त अरब अमिरात, टय़ुनिशिया, चिनी तैपेई आणि बहरीन या संघांबरोबर होणार आहेत. स्विडीश प्रिमियर लीग स्पर्धेतील संघाबरोबर भारतीय महिला फुटबॉल संघ दोन सामने खेळणार आहे. कोरोना महामारीमुळे स्वीडनमध्ये भारतीय नागरिकांना अद्याप प्रवेशबंदी आहे.