वृत्तसंस्था / ब्लोमफाऊंटन
भारताचा अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर अनधिकृत कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील दुसऱया अनधिकृत कसोटी सामन्याला येथे मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने या कसोटीवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
उभय संघातील चार दिवसांची पहिली अनधिकृत कसोटी गेल्या आठवडय़ातील शुक्रवारी खराब हवामानामुळे अनिर्णित राहिली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन या धोकादायक व्हेरियंटचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेबरोबरचा हवाई प्रवास जगातील बऱयाच देशांनी खंडित केला आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या येथील परिस्थिती गंभीर असून या अनधिकृत कसोटी मालिकेचे भवितव्य अधांतरी झाले आहे. जोहान्सबर्गमधील दक्षिण आफ्रिका आणि हॉलंड यांच्यातील दोन वनडे सामने कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या वरि÷ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा डिसेंबर महिन्यात आयोजित केला आहे. 9 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिकेत आगमन होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा सात आठवडय़ांचा दौरा आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून कदाचित भारताचा हा दौरा लांबणीवर किंवा रद्द केला जाईल, असा अंदाज आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात 3 कसोटी, 3 वन डे आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील सामने जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊनमध्ये खेळविले जाणार आहेत.
भारत अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाळकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, के. गौतम, बाबा अपराजित, राहुल चहर, ईशान पोरेल, सौरभ कुमार, उपेंद्र यादव, नागवासवाला यांचा समावेश आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया या दुसऱया अनधिकृत कसोटीतील खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल.