वृत्तसंस्था / अँटवर्प
भारतीय पुरूष हॉकी संघ सध्या युरोपच्या दौऱयावर असून शनिवारी या दौऱयातील झालेल्या तिसऱया सामन्यात भारताने ब्रिटनला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.
शनिवारी झालेल्या या सामन्यात ब्रिटनच्या ऍलेन फोर्सेतने 25 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. तत्पूर्वी म्हणजे 10 व्या मिनिटाला मिळालेला पहिला पेनल्टी कॉर्नर ब्रिटनने वाया घालविला. सामना संपण्यास 3 मिनिटे बाकी असताना सिमरिनजीत सिंगने भारताला बरोबरी साधून दिली. या युरोपच्या दौऱयात भारताने आतापर्यंत एकही सामन्यात पराभव स्वीकारलेला नाही. या दौऱयातील आता चौथा आणि शेवटचा सामना सोमवारी खेळविला जाणार आहे.