वृत्तसंस्था/ दोहा
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या पेत्रा क्विटोव्हाने महिला एकेरीचे जेतेपद मिळविताना स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाचा पराभव केला.
2019 नंतर क्विटोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. शनिवारच्या अंतिम सामन्यात क्विटोव्हाने मुगुरूझाचा 6-2, 6-1 असा पराभव केला. क्विटोव्हाने पहिल्या सेटमध्ये सलग सातवेळा मुगुरूझाची सर्व्हिस तोडली. क्विटोव्हाने यापूर्वी म्हणजे 2019 च्या एप्रिलमध्ये स्टुटगार्ट येथे झालेल्या स्पर्धेत आपले शेवटचे विजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत झेकच्या क्विटोव्हाला दुसऱयाच फेरीत पराभूत व्हावे लागले होते.