वृत्तसंस्था/ मँचेस्टर
युरोपा लिग फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारी येथील ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर खेळविल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाने एएस रोमा संघाचा 6-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत अंतिम फेरीच्या दिशेने आपली वाटचाल केली आहे.
गुरुवारच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे ब्रुनो फर्नांडिस आणि एडीनसन कॅवेनी यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. या सामन्यात पूर्वार्धात एएस रोमा संघातील तीन फुटबॉलपटू जखमी झाल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. मध्यंतरापर्यंत रोमा संघाने मँचेस्टर युनायटेडवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. पण उत्तराधार्थ मँचेस्टर युनायटेडतर्फे आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देण्यात आल्याने रोमा संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मँचेस्टर सिटीतर्फे मॅसन ग्रीनवुड आणि पोग्बा यांनी प्रत्येकी एक गोल केला. आता मँचेस्टर युनायटेड संघाचा पुढील सामना व्हिलारेल आणि अर्सेनेल यांच्यातील विजयी संघाबरोबर होणार आहे.