वृत्तसंस्था/ पॅरीस
युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड आणि व्हिलारेल यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. मँचेस्टर युनायटेड संघाने गुरूवारी या स्पर्धेतील सामन्यात एसी रोमाचा तर व्हिलारेलने अर्सेंनेलचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
मँचेस्टर युनायटेड आणि व्हिलारेल यांच्यात 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. मँचेस्टर युनायटेडने शुक्रवारच्या सामन्यात एसी रोमाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. मँचेस्टर युनायटेडने एसी रोमाचा सरासरी 8-5 अशा गोलफरकाने पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे व्हिलारेलने अर्सेंनेलचा पहिल्या टप्यातील लढतीत 2-1 अशा गोलफरकाने आघाडी घेत अंतिम फेरी निश्चित केली.
हिमा दासला पहिला डोस