वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने न्यूकॅसल युनायटेडचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळविले आहे.
या सामन्यात 14 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीचे खाते गनडोगेनने उघडले. मध्यंतरापर्यंत मँचेस्टर सिटीने 1-0 अशी आघाडी घेतली होती. मँचेस्टर सिटीचा दुसरा गोल टोरेसने केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटी संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 सामन्यांतून 26 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. न्यूकॅसल युनायटेड 18 गुणांसह 12 स्थानावर आहे.