प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाने जिल्हय़ात 24 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्हय़ामध्ये आतापर्यंत मृत्यू होण्याची संख्या 483 वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्हय़ामध्ये एकूण 1 हजार 131 रुग्ण आढळले आहेत तर 844 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळांमधून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 69 हजार 106 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 40 हजार 790 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या 17 हजार 833 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार सुरू आहेत. दुसऱया लाटेचा दणका कर्नाटक राज्याला बसला आहे. त्यामध्ये बेळगावलाही मोठा फटका बसला असून रुग्णसंख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊन करूनही ही संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागही हतबल झाला आहे. जनतेनेच आता काळजी घेणे गरजेचे असून कोरोनाचे नियम पाळणे ही काळाची गरज बनली आहे.
केवळ कोरोना पॉझिटिव्हच नाही तर दगावणाऱयांची संख्याही वाढली असल्यामुळे प्रत्येकानेच याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. सरकारी आकडय़ानुसार 24 जणांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याची चर्चा सुरू आहे.
मंगळवारी शहरातील कणबर्गी, कुमारस्वामी लेआऊट, लक्ष्मीनगर-वडगाव, शहापूर, महांतेशनगर, नाथ पै सर्कल, शहापूर, कुडची, नाझर कॅम्प-वडगाव, पाटील गल्ली-खासबाग, अशोकनगर, रामतीर्थनगर, आझमनगर, बाजार गल्ली-वडगाव, बापट गल्ली, बसवाण गल्ली, बसवण कुडची, भाग्यनगर, बॉक्साईट रोड, कॅम्प, टिळकवाडी, अनगोळ, शहापूर, सदाशिवनगर, समादेवी गल्ली, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, गोडसेवाडी, गुरुप्रसाद कॉलनी, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, खडेबाजार-बेळगाव, जाधवनगर, वड्डर छावणी, उद्यमबाग, टीव्ही सेंटर, वंटमुरी कॉलनी, वैभवनगर, विश्वेश्वरय्यानगर, वझे गल्ली-वडगाव, झटपट कॉलनी-अनगोळ यासह इतर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातील उचगाव, बी. के. कंग्राळी, बडस के. एच., बाकनूर, बाळेकुंद्री के. एच., विद्यानगर, बेनकनहळ्ळी, बेनचिनमर्डी, हिरेबागेवाडी, येळ्ळूर, काकती, सांबरा, गौंडवाड, गणेशपूर-हिंडलगा, कुरबरहट्टी-धामणे, हंगरगा, हिंडलगा, नंदिहळ्ळी, बडाल अंकलगी, हुदली, नालगट्टी, मण्णूर, कावळेवाडी, कंग्राळी खुर्द, बस्तवाड, कोंडुसकोप्प, अरळीकट्टी, मंडोळी, मारिहाळ, मुचंडी, पिरनवाडी, भेंडीगेरी, बैलवाड, पंतनगर, सुळगा, संतिबस्तवाड, मच्छे, सांबरा यासह इतर गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.