बेंगळूर : बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेले 1.23 किलो सोने मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱयांनी जप्त केले आहे. या प्रकरणी केरळच्या कासरगोडू येथील इस्माईल अहमद कल्लार याला अटक करण्यात आली आहे. इस्माईल अहमद हा दुबईहून एका महिलेसोबत मंगळूर विमानतळावर उतरला होता. त्याने अंतर्वस्त्रामध्ये बेकायदेशीरपणे आणलेले सोने लपवून ठेवले होते. याबाबत संशय आल्याने सीमाशुल्क अधिकाऱयांना आल्यानंतर तात्काळ त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्याजवळ 57.14 लाखांचे 1.23 किलो सोने आढळून आले. सदर सोने जप्त करून अधिकाऱयांनी त्या व्यक्तीला अटक केली.
Previous Articleचिंताजनक : महाराष्ट्रात 36,902 नवे कोरोनाबाधित,112 मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.