मंड्या/प्रतिनिधी
मंड्या जिल्हा पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या ‘रेमो’ या श्वानाने अखेरचा श्वास घेतला. १४ वर्षीय रेमो श्वानाच्या मृत्यूनंतर जिल्हा पोलिसांनी डीआर मैदानावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक के. परशुराम यांनी जिल्हा पोलिसांच्या श्वान पथकात असणारा सर्वात जुना रेमो हा दोन महिन्यांपासून आजारी होता. रेमो स्फोटक पदार्थ शोधण्यास माहिर होता. सन २०१८ मध्ये धारवाड पोलिसांचे श्वानपथक मंड्या पोलिसांच्या डॉग टीममध्ये आणले गेले. यापूर्वी रेमो पोलिसांना स्फोटक शोधण्यात मदत करण्यासाठी बेंगळूर पोलीस डॉग टीममध्ये होता, अशी माहिती दिली.