प्रतिनिधी / बेळगाव
‘नव्या वाटा नवी क्षितिजे’ असा अभिनव उपक्रम मंथन कल्चरल ऍन्ड सोशल वेल्फेअर सोसायटी घेऊन येत आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱया व प्रामुख्याने युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱया तरुणाईला बोलते केले जाणार आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याचे एक अवकाश असते, एक क्षितीज असते. आयुष्याच्या वाटेवरून चालताना एखादे वळण असे येते की जेथे आपले ध्येय गवसते. एका क्षितिजाचा ध्यास लागतो. मग जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर त्या क्षितिजाला गवसणी घालण्याचा प्रयत्न सुरू होतो. असाच क्षितिजाला गवसणी घालणाऱया बेळगावमधील युवा शक्तीचा परिचय होण्यासाठी नव्या वाटा, नवी क्षितिजे हा उपक्रम घेण्यात येत आहे. या श्रुंखलेतील पहिले शिलेदार आहेत आयएफएस मैत्रेय कुलकर्णी. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता गुगल मीटद्वारे हा कार्यक्रम होईल. कै. ऍड. एल. बी. नाईक ऊर्फ दादासाहेब गळतगेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम होत असून मंथनच्या युटय़ुब चॅनेलवरसुद्धा तो पाहता येईल.