शहापूर पोलिसांची कारवाई; 15 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर येथे दोघा मटका बुकींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 15 हजार 150 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या.
अक्षय विनोद राजगोळकर (वय 26, मूळचा माळी गल्ली, सध्या रा. एसपीएम रोड, बेळगाव), रविंद्र राम खटावकर (वय 40, रा. भांदूर गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या दोघांवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शहापूर येथील शिवाजी उद्यानाजवळ हे दोघे मटका घेत होते. याची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यु. टी. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून या दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.